नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर डीपीचा स्फोट
नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर डीपीचा स्फोट
img
दैनिक भ्रमर

नाशिक (चंद्रशेखर गोसावी) - गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेल्या विद्युत डीपीचा स्फोट झाल्यामुळे काही काळ खळबळ उडाली होती. दरम्यान हा स्फोट डीपीचा  असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलवून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. 

नाशिक मध्ये लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मिरवणूक सुरू झालेली आहे. ही मिरवणूक चालू असतानाच मेहेर ते अशोक स्तंभ या दरम्यान  डॉक्टर गुप्ते यांच्या रुग्णालया शेजारी असलेल्या विद्युत डीपीचा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर आवाज झाल्यामुळे काही काळ खळबळ उडाली होती.

काही क्षणातच हे लक्षात आले की, विद्युत डीपीचा हा स्फोट आहे. तातडीने या घटनेची माहिती विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासाने विद्युत विभागाचे वायरमन आणि इतर अधिकारी हे या ठिकाणी दाखल झाले. ही डीपी दुरुस्त करण्याचं काम सुरू असून मिरवणूक मार्गावर अंधार पसरलेला होता.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group