संतापजनक : 'त्याने लेडीज टॉयलेटमध्ये लपवला कॅमेरा' ; मुलीने असा पकडला रंगेहाथ...
संतापजनक : 'त्याने लेडीज टॉयलेटमध्ये लपवला कॅमेरा' ; मुलीने असा पकडला रंगेहाथ...
img
Dipali Ghadwaje
बंगळुरुतील एका कॉलेजमधील २१ वर्षीय तरुणाने संतापजनक कृत्य केले. कुंबलगोडूजवळील खासगी कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावल्याप्रकरणी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. हे प्रकरण उघड होताच विद्यार्थिनींनी रोष व्यक्त केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कुशल गौडा असे आरोपीचे नाव असून तो चिक्कगोल्लारहट्टी येथील रहिवासी आहे. कुशल लेडीज टॉयलेटमध्ये लपून बसला होता आणि त्याचा मोबाईल फोन शेजारील टॉयलेटच्या भिंतींच्या मधोमध ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले.

इथे सात खोल्या असून, त्यामध्ये प्रत्येक भिंतीमध्ये अंतर आहे. या प्रकरणी आरोपी कुशलला रंगेहात पकडण्यात आले. टॉयलेटमध्ये गेलेल्या एका मुलीने भिंतीच्या मधोमध ठेवलेला मोबाईल पाहिला आणि तिला गजर ऐकू आला. ती पटकन बाहेर आली आणि तिने टॉयलेटला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर इतरांनी येऊन कुशलला बाहेर ओढून मुख्याध्यापकांच्या दालनात नेले. कॉलेज व्यवस्थापनाकडून तक्रार आल्यानंतर आम्ही त्याला अटक केली आणि मोबाइल फोन जप्त केला.

आरोपी रंगेहात सापडला 

कुशलचा फोन तपासला असता जवळपास १५ मिनिटे त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच संबंधित मुलीला सकाळी १०.४५ च्या सुमारास गजर ऐकू आला. म्हणजेच सकाळी १०.३० च्या सुमारास त्याने टॉयलेटमध्ये प्रवेश केला आणि मोबाईल ठेवला. महिलांच्या शौचालयाजवळ बसवलेले सीसीटीव्ही काम करत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी अनेक दिवसांपासून हे कृत्य करत होता. तो चोरुन व्हिडीओ काढत असे. जेव्हा त्याला एका विद्यार्थिनीने रंगेहात पकडले तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीचा फोन तपासला असता त्यामध्ये सात-आठ व्हिडीओ सापडल्या. विद्यार्थिनींनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group