क्लासचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, नाशिक जिल्ह्यातील प्रकार
क्लासचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, नाशिक जिल्ह्यातील प्रकार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- चांदवड शहरात एका क्लासचालकाने मित्रासह विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी क्लासचालक व त्याच्या मित्राविरुद्ध पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की चांदवड बस स्थानकासमोरील व्यापारी संकुलात युनिकॉर्न कॉम्प्युटर नावाचा क्लास आहे. या क्लासचा संचालक शोएब नाईक व त्याचा मित्र विशाल जाधव या दोघांनी पीडित युवतीला अयोग्यरीत्या स्पर्श करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार ऑगस्ट 2024 ते दि. 17 सप्टेंबर 2024 दरम्यान घडला. पीडितेने त्यांना हटकले असता “तू टेन्शन घेऊ नकोस.

आम्ही कोणाला सांगणार नाही,” असे म्हणत तिला एका फ्लॅटवर बोलावण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या पीडितेने तेथून पळण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला अडवले. हा सर्व प्रकार तिने पोलीस ठाण्यात सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

या घटनेने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. अशा क्लासचालकांना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group