धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,  व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट
img
दैनिक भ्रमर
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून महिला, मुलींच्या मनात पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सध्या त्याच्या विरूद्ध कडक कायदे करण्याची मागणी होत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे . १७ वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेबाबत कुणाकडे वाच्यता केलीस तर तुला ठार करु अशी धमकीही आरोपींनी तिला दिली होती. जिवाच्या भीतीने ती मुलगी गप्प राहिली.  मध्य प्रदेशातील दातिया या ठिकाणी ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास १७ वर्षांची मुलगी शेतात पिक कापणीसाठी गेली होती. ती शेतात एकटीच आहे हे पाहून जसवंत पाल आणि नीरज अहिरवर या दोघांनी तिला शेतातून पळवलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शेतातून पळवून नेताना त्यांनी तिच्या मुसक्या बांधल्या होत्या. त्यामुळे ती बचावासाठी ओरडू शकली नाही.

या  विषयी अधिक माहिती अशी की, या दोघांनी जेव्हा अल्पवयीन मुलीला पळवून नेलं त्यानंतर तिथे सत्तेंद्र नावाचा आणखी एकजण आला. त्याने मुलीवर बलात्कार  करतानाची घटना मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली आणि व्हिडीओ तयार केला. या घटनेनंतर या तिघांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला जो व्हायरल झाला. तिघांनी या मुलीला धमकी दिली की या घटनेची कुठे वाच्यता केलीस तर आम्ही तुला ठार करु. ही मुलगी घटनेने खूप घाबरली होती. तिने याबाबत तिच्या घरातल्यांनाही काहीच सांगितलं नाही. मात्र तिच्या भावाने जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या  घटनेनंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दुसरे दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबानेही व्हायरल व्हिडीओ नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसंच मुलीला धीर देत काय घडलं आहे ते विचारलं तेव्हा तिने सगळा प्रकार सांगितला. जसवंत पाल, सत्येंद्र आणि नीरज अहिरवर या तिघांविरोधात पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group