खळबळजनक ! एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या
खळबळजनक ! एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आहे. एकाच घरातील चौघा जणांचे मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली.  मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश असून त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार , या घटनेमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. विजय पचोरी (वय 68), त्यांची पत्नी मालाबाई पचोरी (वय 55), मुलगा दीपक पचोरी (वय 38) व गणेश पचोरी (वय 38) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेबद्दल समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.  
 
कुटुंबातील या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.मात्र यामुळे मोवाड गावात भीतीचे वातावरण आहे.  या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिकची टीमही घटनास्थळी दाखल झाली. 

या कुटुंबाने आयुष्य का संपवले असावे, ही आत्महत्या आहे की हत्या असे बरेच प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे त्या कुटुंबियांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group