अपघात होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वेगावर नियंत्रण न पाळल्याने इतरांच्या जीवाला धोका पोहोचतो, याची जाणिव वाहनचालकांना नसते. याची प्रचिती आज पुन्हा पाहायला मिळाली. मुंबईतल्या गोरेगावच्या रस्त्यावर विचित्र घटना पाहायला मिळाली. एका वेगवान डम्परने बाइकस्वाराला जोरदार ठोकर दिली. या घटनेत एका शालेय मुलीचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऑबेरॉय मॉलच्या जवळ ही घटना घडली. एक लहान मुलगी आपल्या वडिलांसोबत बाईकवरुन शाळेत चालली होती. तेव्हा मागून वेगाने येणाऱ्या एका डम्परने दुचाकीला ठोकर दिली. या घटनेतमुलीचा जागेवरच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. घटनेत मृत्यूमुखी पावलेली मुलगी 13 वर्षांची होती. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.