२ ऑक्टोबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- साखरपुडा झाल्यानंतर लग्नास नकार देऊन तरुणीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाला अटक करून त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणी ही नाशिकरोड परिसरात राहते. आरोपी अनिकेत विजय जाधव (रा. हिरावाडी, पंचवटी, नाशिक) व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडित तरुणीसोबत दि. 10 जुलै 2024 रोजी साखरपुडा केला. नंतर लग्नास नकार देऊन पीडितेची फसवणूक केली, तसेच दि. 19 जुलै रोजी आरोपी अनिकेत जाधव हा पीडितेच्या घरी गेला व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दि. 5 ऑगस्ट रोजी नाशिक येथील हॉटेल कम्फर्ट इन त्र्यंबकेश्वर येथे फिरण्यासाठी बाहेर जाण्याच्या बहाण्याने पीडितेला सोबत नेले व तेथेही तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी अनिकेत जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar