मनमाडच्या माजी आमदारासह सात जणांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल
मनमाडच्या माजी आमदारासह सात जणांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर
मनमाड (प्रतिनिधी) :- नागापूर येथील प्रसिद्ध नागेश्वर मंदिराच्या नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या मालकीची त्र्यंबकेश्वर येथील जमीन बनावट दस्त, खोट्या सह्या, आणि दुसराच व्यक्ती उभा करून खोट्या दस्ताच्या आधारे १ कोटी १० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नागेश्वर मंदिराचे ट्रस्टी राजेंद्र वाल्मिक पवार यांनी माजी आमदार संजय सयाजी पवार यांच्यासह सात जणांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथून जवळ असलेल्या नागापूर येथील प्रसिद्ध नागेश्वर मंदिराच्या  नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या स्वतःच्या मालकीची  त्र्यंबकेश्वर येथे जमीन होती. गट नंबर ३५१ / १ / २ या गटातील ८१ आर. हे ही जमीन फसवणूक करून विकली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नागापूर येथील राजेंद्र वाल्मिक पवार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे राजेंद्र पवार हे नागेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी आहेत. दिलेल्या फिर्यादेतं म्हटले आहे की, संजय सयाजी पवार (वय ४०, रा. नागापूर), रफनंदनपुसरी हरनारायणपुरी ( वय ८५ समाज प्रबोधन रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबक), लोकेश अशोक गवळी (वय ३८, रा. सातपूर कॉलनी नाशिक), हर्षल अविनाश शिखरे (वय ३६, रा शिवाजी चौक, ता. त्र्यंबकेश्वर),  संपत विष्णू चव्हाण (वय ४१, रा., अंजनेरी ता. त्रंबकेश्वर) धनंजय मोहन देशमुख (वय ३७, रा. देशमुख चौक ता. त्रंबकेश्वर) तसेच इतर दोन व्यक्ती आशा आठ जणांनी संगनमताने कटकारस्थान करत नागापूर येथील प्राचीन नागेश्वर महादेव मंदिराच्या नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या मालकीची त्र्यंबकेश्वर येथील जमीन ही  १७/०९/२०१४ ते ०३/१२/२०१४ दरम्यान मनमाड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट दस्तऐवज बनवुन यातील तत्कालीन ट्रस्टी महंत हरनारायनपुरी यांचे बनावट सह्याकरून त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करुन दुय्यम निबंधक कार्यालय मनमाड येथे खरेदी दस्त तयार करून सदर मिळकत विक्री करून तीचा १ कोटी १० लाख रुपयांचा अपहार केला. या अपहार प्रकरणी नागेश्वर मंदिराचे ट्रस्टी राजेंद्र वाल्मीक पवार यांनी फिर्याद दिली असून त्रंबकेश्वर पोलीस स्थानकातून हा गुन्हा मनमाड पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group