सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन मुलीवर ही अत्याचाराची केल्याची घटना पुण्यात घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
पीडित तरुणी ही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच बॅड टच या उपक्रमातून ही घटना समोर आलीय. ही घटना समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पीडित तरुणीसोबत हा सगळा प्रकार एप्रिलपासून घडत आला होता. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती, अशी माहिती समोर आली आहे.
यावरूनच आरोपी तरुणांशी तिची मैत्री झाली. दरम्यान, आरोपी तरुण हे एकमेकांना ओळखत नाहीत. पिडीत तरुणीला भेटण्यासाठी आलेल्या एकाने तिच्यावर महाविद्यालयात अत्याचार केले.
तर दुसऱ्याने तिच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतर २ तरुणांनी सुद्धा तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. या सर्व घटना पिडीत तरुणीने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या, तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या 'गुड टच बॅड टच' अभियानात असलेल्या समुपदेशक यांना सांगितल्या. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
हे संपूर्ण प्रकरण पीडित मुलीच्या आई आणि वडिलांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई आणि तपास करत आहेत.