माकडांच्या टोळीमुळे ६ वर्षीय चिमुकली लैंगिक अत्याचारापासून बचावली; वाचा नेमके काय घडले
माकडांच्या टोळीमुळे ६ वर्षीय चिमुकली लैंगिक अत्याचारापासून बचावली; वाचा नेमके काय घडले
img
दैनिक भ्रमर
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी माकडांच्या टोळ्यांकडून घातला जाणारा उच्छाद हा तिथे येणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरतो.
मात्र अशाच एका माकडांच्या टोळक्याने एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाच्या प्रयत्न करत असलेल्या इसमाला धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील बागपत येथे या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत अज्ञात आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर जबरदस्ती करणारा आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका निर्जनस्थळी आरोपी या मुलीला घेऊन गेला व तिथे तो मुलीसोबत गैरवर्तन करण्याच्या प्रयत्नात होता. तेवढ्यात माकडांची एक टोळी तेथे आली आणि त्या माकडांनी आरोपीवर हल्ला केला. त्यामुळे आरोपी घाबरून पळून गेला. माकडांमुळे ही मुलगी एका हैवानाची शिकार होण्यापासून बचावली. 

दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलीने घरी पोहोचत तिच्या घरच्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तसेच माकडांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमापासून तिला कसं वाचवलं, याचं वर्णन केलं. दरम्यान, पीडित मुलीचे वडील म्हणाले की, माझी मुलगी बाहेर खेळत होती. तेव्हा आरोपी तिला घेऊन गेला. जवळच्या सीसीटीव्हीमध्ये तो मुलीला चिंचोळ्या गल्लीत घेऊन गेला. आतापर्यंत आरोपीची ओळख पटलेली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group