१३ ऑक्टोबर २०२३
नाशिक (प्रतिनिधी) :- पंचवटीत मखमलाबाद नाका परिसरात एका युवकावर जुन्या वैमनस्यातून तरुणांच्या एका टोळक्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सागर विष्णू शिंदे (वय 28, रा. मखमलाबाद नाका) हा युवक ठार झाला.
याबाबत माहिती अशी, की सागर विष्णू शिंदे याचे याच परिसरात राहणार्या केदार साहेबराव इंगळे याच्याशी जुन्या वैमनस्यातून वाद झाले होते. शुक्रवारी दुपारी मयत सागर शिंदे व त्याचा मित्र आकाश इंगळे, योगेश वाघ हे याच परिसरातील एका बंद गोडाऊनजवळ बसून मद्यपान करीत होते. ही माहिती केदार साहेबराव इंगळे यास समजताच इंगळे याने ऋषिकेश आहेर व अन्य काही मित्रांसह गोडाऊनजवळ धाव घेतली.
यावेळी सागर शिंदे आणि इंगळे यांच्यात बाचाबाची होऊन सागरवर चाकूहल्ला करून हल्लेखोर टोळके फरार झाले. या हल्ल्यात चाकूचे अनेक वार झाल्यामुळे सागर शिंदे हा युवक मरण पावला. पंचवटी पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Copyright ©2024 Bhramar