१९ ऑक्टोबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- व्यावसायिक इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की नाशिक-वडाळा रोडवरील साईनाथनगर चौकात प्रतिभा संकुल ही व्यावसायिक इमारत आहे. आत्महत्या केल्यानंतर तिचे ओळखपत्र पाहून तेथील दुकानदारांना तिची ओळख पटली. 22 वर्षीय मृत विद्यार्थिनी ही जेएमसीटी कॉलेजमध्ये बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली, हे समजू शकले नाही. घटना घडल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar