बॉलिवूड कलाकारांसह राजकीय , सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात दाखल
बॉलिवूड कलाकारांसह राजकीय , सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात दाखल
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने  अखेरीस सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर आता ०५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी मनधरणी केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे समजते.

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिम्मंता बिस्वा, गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार, अरुणाचल सीएम पेमा खंडू, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी मुंबईत आले आहेत.
 
अवघ्या काही वेळातच महायुती सरकराचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीच्या कार्यक्रमाची आसनव्यवस्था निश्चित झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मुंबईत पोहोचले आहे तसेच महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा मुंबईत दाखल झाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group