ठाकरे गटाच्या महिला नेत्याचं मोठं विधान! म्हणाल्या,
ठाकरे गटाच्या महिला नेत्याचं मोठं विधान! म्हणाल्या,"सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्याशी..."
img
Dipali Ghadwaje
मुंबई : महायुती सरकारचा आज मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी पाहायला मिळत आहे. या शपथविधीच्या तीन तासांआधी महायुतीचा पेच सुटल्याचं बोललं जात आहे. या शपथविधीला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या शपथविधीच्या दिवशी ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी ईव्हीएमवरून महायुतीवर टीका केली. अंधारे म्हणाल्या, 'आजचा शपथविधी जनमताने होत नाही तर ईव्हीएमच्या आशीवार्दाने हे सरकार आलं आहे. ईव्हीएमच्या मताच्या चोरीतून आलेलं सरकार आहे'.

'आम्ही हे आंदोलन राज्यभर पोहोचवू. जनतेने देखील आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगवे म्हणजे ड्रामेबाजी सुरु आहे. ईव्हीएमवरून लक्ष हटवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रुसव्या फुगव्याचं नाटक करत आहेत', असे त्या म्हणाल्या.

'उदय सामंत यांना जर सांगितलं की, उपमुख्यमंत्रिपद तुम्हाला देवू तर एका मिनिटात हे एकनाथ शिंदे यांना सोडून जातील. हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील गद्दारी करतील, असेही त्या पुढे म्हणाल्या.

'एकनाथ शिंदे यांना गृहखातच काय इतर खाते देखील मिळण्याची मारामार आहे. या सर्व नेत्यांना त्यांच्या खात्याचं पडलं असून राज्याच्या जनतेचं नाही. जे जातील त्यांना लखलाभ आहे. मला जायचं असते तर मी उन्हात का थांबले असते, अशी टीका अंधारे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group