माजी मंत्री मधुकर पिचड यांचं  दुःखद निधन
माजी मंत्री मधुकर पिचड यांचं दुःखद निधन
img
दैनिक भ्रमर
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं दुःखद निधन झालं आहे. ते  84 वर्षांचे होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते.  आज दुपारी पिचड यांची प्रकृती खालावली. संध्याकाळी त्यांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. पिचड यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष पद भुषवलं होतं. त्यानंतर त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिचड यांनी आपल्या मुलासह प्रवेश केला होता. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group