अखेर ठरलं! एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
अखेर ठरलं! एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
img
Dipali Ghadwaje
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही आहोत,असं म्हणत असताना शिंदेंनी गृहमंत्रिपदाची मागणी लावून ठेवली. मात्र भाजप गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नसल्यानं महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे राहणार की नाही याचा सस्पेन्स कायम होता. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी होणार की नाही या महानाट्यावर आता पडदा पडलाय. 

एकनाथ शिंदे अखेरीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालंय. शपथ घेण्याविषयीचे पत्र घेऊन ते राजभवनावर जाणार असल्याचं माहिती गुलाबराव पाटील यांनी दिलीय.

शपथविधीची निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 

'काळजीवाहू मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सर्वांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली की ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर गृहखातं शिंदेसाहेबांना मिळावं अशी आजही आमची मागणी असल्याचंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group