कुत्र्यावर एयरगनच्या छराने हल्ला ; पोलीसांत गुन्हा दाखल
कुत्र्यावर एयरगनच्या छराने हल्ला ; पोलीसांत गुन्हा दाखल
img
Dipali Ghadwaje
दोन दिवसांपूर्वी पुण्यात बाणेर परिसरात गळफास लागल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी चतुर्शिंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज पुण्यात हडपसरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीने रागाच्याभरात कुत्र्याला एयरगनचा छरा मारून जखमी केलं आहे. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमधील “इन्केव्ह लोकमंगल सोसायटी” झेड कॉर्नर,मांजरी बुद्रुक येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुत्रा नेहमी त्रास देतो या कारणावरून त्याला एअरगनचा छरा मारून जखमी करण्यात आलंय. या प्रकरणी हडपसर  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अली रियाज थावेर या आरोपीस ताब्यात घेतलं आहे. हडपसर पोलीस या प्रकरणी अधित तपास करत आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group