मोठी दुर्घटना  : फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, इतक्या  जणांचा होरपळून मृत्यू
मोठी दुर्घटना : फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, इतक्या जणांचा होरपळून मृत्यू
img
Dipali Ghadwaje
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागली. आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला आग लागली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. हे फटाका गोदाम  विनापरवाना सुरू होते, असंही म्हटलं जात आहे. 

काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवलं आहे. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.  वाढदिवसाल्या लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सचा हा कारखाना होता. या लागलेल्या आगीत कारखान्यातील वस्तू जळून खास झाल्या आहेत. 

काय म्हणाले पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह?
या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा  कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. काही कामगार  गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

या आगीत मृत्यू झालेल्या सहा जणांची ओळख अजूनही पटलेली नाही मात्र यात 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जखमींमध्ये 7 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. या सगळ्या जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या कारखान्यात जवळपास 20 ते 25 कामगार काम करत होते. मात्र दुपारच्या सुमारात आग लागली आणि कामगारांनी आरडा ओरड सुरु करत या कारखान्यातून बाहेर पडले. मात्र सहा जण याच आगीतून स्वत:चा बचाव करण्यात अपयशी ठरले आणि त्यांचा होरपळून मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
 
 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group