भीषण आग : कारखाना जळून खाक, संपूर्ण परिसरात धुराचे लोट
भीषण आग : कारखाना जळून खाक, संपूर्ण परिसरात धुराचे लोट
img
Dipali Ghadwaje
बदलापुरातून आग लागल्याची घटना समोर आली आहे . बदलापूरच्या आंबेशीव गावात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चलचित्राचा कारखाना जळून खाक झाला आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरजवळील आंबेशीव गावात भीषण लागली आहे. या आगीत चलचित्राचा कारखाना जळून खाक झाला आहे. अज्ञात इसमाने या भागात एका ठिकाणी आग लावल्याने ही आग कारखान्यापर्यंत पोहोचली. 

दरम्यान कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात चलचित्रसाठी लागणारे लाकडी आणि पीओपीचे विविध साहित्य होते. आगीमुळे भक्ष्यस्थानी आल्याने आग वाढत गेली. आगीची भीषणता पाहता परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या परिसरातील नागरिकांनी तातडीने बदलापूर अग्निशमन दलाला माहिती दिली.

कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात कारखान्याचे नुकसान झाले आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group