तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’. या लोकप्रिय गाण्याचे गीतकार जहीर आलम यांचं आज निधन झालं आहे. ते नागपुरात वास्तव्याला होते. जहीर आलम नागपूरच्या मोमीनपुरा या वस्तीतील एका छोट्याशा घरात वास्तव्यास होते. त्यांचे जीवन संघर्षात आणि आर्थिक विवंचनेत गेले.
गेल्या काही वर्षांपासून ते नागपूरकारांच्या विस्मरणात गेले होते.‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’ हे गीत सुरुवातीला स्थानिक स्तरावर गायले जात होते. त्यानंतर त्याला अल्ताफ राजा यांनी गायल्यानंतर हे गीत अजरामर झाले. त्यांच्या या सदाबहार गाण्याने अनेकांचा फायदा झाला. मात्र,त्यांची झोळी रिकामीच राहिली.