भीषण ;  १२ वर्षांच्या चिमुरड्याला भरधाव कारने चिरडलं, चार जणांना  बेड्या
भीषण ; १२ वर्षांच्या चिमुरड्याला भरधाव कारने चिरडलं, चार जणांना बेड्या
img
दैनिक भ्रमर



आजकाल अपघाताच्या प्रमाणात  मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अशीच एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.शिर्डी-नगर महामार्गावर एका भरधाव कारने सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चिरडल्याची हृदयद्रावक घटना राहाता येथे घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 12 वर्षीय ओंकार दीपक गायकवाड याचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाहनाच्या धडकेत ओंकार गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने लोणी आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले होते. मात्र, काळाने त्याच्यावर झडप घातली आणि आज उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. 

 दरम्यान , या प्रकरणातील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी मृतकाच्या नातेवाईकांनी जोरदार आंदोलन केले. मृत ओमकार गायकवाड या चिमुरड्याचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.राहाता शहरातील 13 वर्षीय चिमुकल्या ओमकार गायकवाड मृत्यू प्रकरणात पोलिसांनी नातेवाईक आणि ग्रामंस्थाच्या रोषानंतर तातडीने या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून राहाता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.पोलिसांकडून चार आरोपींना बेड्या राहाता शहरातील श्रीकृष्ण मंदिर परिसरातील रस्त्यावर झालेल्या अपघातात ओमकार गंभीर जखमी झाला होता. मात्र त्यास मदत करण्याऐवजी आरोपींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. उपचारादरम्यान ओमकारचा मृत्यू झाला आणि त्यानंतर नागरिकांमध्ये संताप उसळला.

या घटनेनंतर राहाता पोलिसांनी तातडीने तपास करत चारही आरोपींना अटक करत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात गौरव भोसले , संस्कार विखे , गोकुळ चिकणे आणि अमन पाववाला यांना राहाता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.एका भरधाव कारने सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चिरडल्याची हृदयद्रावक घटना राहाता येथे घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 12 वर्षीय ओंकार दीपक गायकवाड याचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाहनाच्या धडकेत ओंकार गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने लोणी आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले होते. मात्र, काळाने त्याच्यावर झडप घातली आणि आज उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ओंकार हा सातवीत शिकत होता, त्याच्या जाण्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group