भारतातील युवांमध्ये इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी; भाषणात काय म्हणाले पंतप्रधान मोदी!
भारतातील युवांमध्ये इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी; भाषणात काय म्हणाले पंतप्रधान मोदी!
img
Dipali Ghadwaje
नाशिक : आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिन आहे. माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. 

युवकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सरकारपेक्षा जास्त वेगाने काम केलं, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. आज भारत जगातील टॉप ५ अर्थव्यवस्था आहे. ही भारताच्या युवकांच्या ताकद आहे.आज भारत जगातील टॉप ३ इकोसिस्टिममध्ये आला आहे.आज भारत एकापेक्षा जास्त इनोवेशन करत आहे. भारत अनेक पेटंट फाईल करत आहे. भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे.

सहकाऱ्यांनो वेळ ही प्रत्येकाला एक संधी देते. वेळेचा हा सुवर्णक्षण आताचा अमृतकाळाचा हा कालखंड आहे. तुमच्याकडे संधी आहे, इतिहास रचण्याची, इतिहासात तुमचं नाव नोंदवण्याची. आज आपण महाराष्ट्राच्या वीर भूमीवर आहोत. या भूमीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक शिक्षणाची दारं उघडली. या सर्व महानव्यक्तांनी देशासाठी आयुष्य वेचलं. हे सर्व जगले ते फक्त देशासाठी, स्वप्न बघितलं ते देशासाठी, संकल्प केले ते सुद्धा देशासाठी. या सर्वांनी देशाला नवी दिशा दिली.

देशाच्या या अमृतकाळात युवकांनी भारताला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. येत्या कालखंडात तुम्ही असं काम करा की आगामी पिढ्या तुमच्या नावाचा गौरव करतील. 

 मोदींचे युवकांना चार मंत्र : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना चार मंत्र मेड इन इंडिया उत्पादनाचा उपयोग करा. मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा. नवीन मतदारांनी मतदानासाठी नोंद करा

काळाराम मंदिरात दर्शन सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं
नाशिक पंचवटी भूमीत प्रभू श्रीरामाने अनेक काळ व्यतीत केला. मी आज या भूमीला श्रद्धापूर्वक प्रणाम करतो. मी आवाहन केलं होतं जानेवारीपर्यंत आपण सर्व २२ जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिराची साफसफाई करावी. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं. मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी देशातील सर्व मंदिरं, सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घानाप्रसंगी ते बोलत होते. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group