आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक
img
दैनिक भ्रमर

मुंबई: मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय आहेत. कोरोना काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी या पूर्वीही सुरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांचा बारीक आकडेवारीसह अभ्यास आहे.

कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिले होते. 

सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group