पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टीवर भाष्य केलं. यावेळी विद्यार्थ्यांनीही व्हर्च्युअल माध्यमातून परीक्षेच्या चर्चेत भाग घेतला आणि पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलांना विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले की, तुम्हाला परीक्षा योद्धा बनायचे आहे, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याचे उदाहरण दिले आणि कठीण प्रसंगांना धैर्याने कसे तोंड द्यावे हे सांगितले.
'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमावेळी सर्व मुलांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या काळात लोकांना थाली वाजवायला का सांगितले होते, याचा खुलासाही केला आहे. त्यांनी लोकांना कोरोना योद्ध्यांच्या नावाने दिवे लावायला का सांगितले? 2020 मध्ये कोरोनाच्या काळात लोकांना थाली वाजवण्यास का सांगण्यात आले होते. यामागचे कारण आता 4 वर्षांनंतर त्यांनी सांगितले आहे.
थाळी वाजवण्याचा उद्देश काय होता?
थाळी वाजवल्याने किंवा दारात दिवा लावल्यामुळे कोरोना माहामारीपासून आपली सुटका होणार नाही हेही मला माहीत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यामुळे कोरोना कमी होत नाही. पण कोरोनाविरुद्धच्या युद्धात देशातील जनतेला एकत्र करण्यासाठी त्यांनी हे केले.
जेव्हा संपूर्ण देशातील लोक एकाच वेळी थाळी वाजवतात आणि एकाच वेळी दिवे लावतात तेव्हा त्यांना एकता दिसून येते. आपण एकट्याने कोरोनाशी लढत नसल्याचे त्यांना जाणवले. संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तरच अडचणीतून बाहेर पडता येईल.
कोरोना ही जागतिक महामारी आहे. त्याच्यामुळे सारे जग त्रस्त झाले होते. मी असं म्हणू शकलो असतो, मी काय करू शकतो? पण मी तसे केले नाही. मला वाटले मी एकटा नाही. देशात 140 कोटी लोक आहेत. सर्वांनी एकत्र येऊन या समस्येला तोंड दिल्यास या समस्येवर मात करू शकतो. म्हणूनच मी टीव्हीवर येत राहिलो. लोकांशी बोलत राहिलो. त्यामुळेच परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही कधीही घाबरू नका, असे पंतप्रधान मोदींनी मुलांना सांगितले. आपल्याला त्या अडचणींचा सामना करायचा आहे आणि विजय मिळवायचा आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.