नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांची पदोन्नतीने बदली;
नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांची पदोन्नतीने बदली; "यांची" झाली नियुक्ती
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर व नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. 

शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यापासून नाशिक ग्रामीण मधील गुन्हेगारीला चांगलाच आळा बसला होता. अवैध धंदे करणारे त्यांच्या रडारावर होते. त्यांची अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

बी. जी. शेखर पाटील यांना अद्याप कुठेही नेमणूक मिळाली नसून त्यांच्या नेमुकीचा स्वतंत्र आदेश करण्यात येणार आहे. शेखर पाटील यांनी स्वतःची विशेष टीम बनवून 5 जिल्ह्यांतील अनेक अवैध धंदे उध्वस्त केले. त्यांच्या कारकिर्दीत परिक्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहिली आहे.

नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे यांची तर पोलीस अधीक्षक पदी विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group