सिन्नर : सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत मुसळगाव येथील केमिकल असलेल्या आदिमा ऑरगॅनिक या केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग शुक्रवारी दुपारच्या सुमारास लागल्याचे समजते आहे. दुपारी सव्वाचार वाजेच्या दरम्यान आकाशात आगीचे लोळ सर्व दूर दिसत असल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार , सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे सर्व कर्मचारी तसेच सिन्नर नगरपालिका अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अग्निशामक जवान करीत आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झाले नसून आग कशी लवकरात लवकर विझवता येईल, यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहे.
ही आग अतिशय भीषण असल्याने आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीत 50 ते 60 कामगार काम करीत असून सर्व कामगार बाहेर आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.