मोठी बातमी! शरद पवार गटाकडून 'हे' चार  चिन्हं निश्चित, एकाची होणार निवड
मोठी बातमी! शरद पवार गटाकडून 'हे' चार चिन्हं निश्चित, एकाची होणार निवड
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीच्याआधी निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोगाचा हा निर्णय पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. शरद पवारांना आता पुढच्या तीन दिवसांमध्ये निवडणूक आयोगाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि नवीन चिन्ह याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. अशातच शरद पवार कोणतं नवीन नाव आणि चिन्ह घेणार? याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

दरम्यान आयोगाने शरद पवार यांना सांगितले आहे की, ते त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही ४ नावे देऊ शकतात. त्यासाठी आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पण अन् चिन्हांनी नाव समोर आली आहेत.

पक्षाचे नाव-

शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष

चिन्ह-

कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य

दरम्यान पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. देवगिरीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी ह्या सुचना दिल्या आहेत. आपल्याला जनमताच्या आधारावर पक्ष-चिन्ह मिळाल, त्याचा मान राखा, असे अजित पवार म्हणाले. जाहीरपणे बोलताना वाद होईल, अशी वक्तव्ये टाळा, पक्ष-चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका. यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील, यासाठी जोमाने कामाला लागा, असे अजित पवार म्हणाले. 

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष शिथिलता देत, आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव सांगण्यासाठी आणि तीन पर्याय देण्यासाठी बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group