Nashik : मैत्री वाढवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले; अडीच वर्षे केला लैंगिक अत्याचार
Nashik : मैत्री वाढवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले; अडीच वर्षे केला लैंगिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अडीच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित तरुणी ही अमरावती येथील मूळची राहणारी आहे. ती नोकरीसाठी पुण्यात आली आहे. आरोपी राहुल गोविंद देवरे (रा. रुद्रा हायस्कूलच्या मागे, माणिकनगर, सिडको) याने पीडित तरुणीशी तिच्या मैत्रिणींच्या माध्यमातून ओळख वाढवली.

त्याने मैत्री करून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिला अनेक स्वप्न दाखवले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या संमतीविना महात्मानगर येथील हॉटेल बंजारा व त्र्यंबक रोडवरील एका हॉटेल येथे नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. काल ती त्याला भेटण्यासाठी नाशिकमध्ये आली होती.  तिथे पण त्याने तिच्यावर अत्याचार केले.

त्यावेळी तिने त्याला लग्नाचे विचारले. रागाच्या भरात तो तिला तिथेच सोडून निघून गेला. तिने त्याचे घर गाठत पुन्हा त्याला विचारणा केली तेव्हा तो विवाहित असल्याचे लक्षात आले. त्या दोघांमध्ये तिथेही जोरदार भांडणे झाली. आरोपी राहुल देवरे याने पीडितेला शिवीगाळ, मारहाण करून दमदाटी केली.

हा प्रकार ऑगस्ट 2021 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात राहुल देवरेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group