आनंदवार्ता!  राज्यातील १४ हजार ६४८ वकिलांना नोटरी पदाची लॉटरी
आनंदवार्ता! राज्यातील १४ हजार ६४८ वकिलांना नोटरी पदाची लॉटरी
img
Dipali Ghadwaje
मंचर : वकील वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वकिली व्यवसाय करणाऱ्यांना नोटरी पदाची लॉटरी लागली आहे. महाराष्ट्रातील १४ हजार ६४८ वकिलांची नोटरी म्हणून केंद्र सरकारने गुरुवारी (ता.१४) रात्री नियुक्तीची यादी जाहीर केली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एवढ्या संख्येने एकाच वेळी नोटरी पदी नियुक्ती होण्याचा हा उच्चांकच म्हणाव लागेल.  

नोटरी पब्लिक ऑटर्नी म्हणून वकील यांना ओळखले जाते. ते कायदेशीर व्यावसायिक आहेत. काही कायदेशीर कार्ये करण्यासाठी अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे, शपथ घेणे व कागदपत्रे प्रमाणित करणे व व्यवहारांची वैधता प्रमाणित करण्याचा अधिकार आहे.

वकिली व्यवसायात पदार्पण केल्या नंतर १० वर्षाचा अनुभव व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते. त्यांच्या ऑनलाइन मुलाखती झाल्या. मुलाखती दिलेल्या जवळपास सर्व वकिलांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे.  

रजिस्टरमध्ये नोंद केलेली नोटरी म्हणजेच रजिस्टर्ड नोटरी समजली जाते. प्रत्येक नोटरीला आलेला दस्त आपल्या रजिस्टर मध्ये नोंद करणे कायदेशीर बंधनकारक आहे. प्रत्येक नोंद दस्तावर नोंदणी नंबर लिहिणे आवश्यकती तिकीटे लावावी लागतात. खेड तालुक्यात ५७ जुन्नर तालुक्यात २६ तर आंबेगाव तालुक्यात १७ जणांची नोटरी पदी वर्णी लागली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group