काँग्रेसच्या लोकसभा प्रचार समिती अध्यक्षपदी 'या' नेत्याची निवड
काँग्रेसच्या लोकसभा प्रचार समिती अध्यक्षपदी 'या' नेत्याची निवड
img
दैनिक भ्रमर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संमतीने काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भातील पत्र काढले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारीच्या दृष्टीने सर्व पावले उचलायला सुरुवात केली आहे. तिसऱ्या यादीत काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांचीही घोषणा केली आहे. त्यासोबतच गुरुवारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार समिती अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपची तिसरी यादी जाहीर ; 'या' ९ उमेदवारांची घोषणा

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री असून केंद्रीय मंत्रीपदाचाही अनुभव त्यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही निवड महत्त्वाची मानली जाते. अलीकडच्या काळात सर्व प्रकारच्या प्रचारात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पृथ्वीराज चव्हाण स्वतः तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत. सोबतच त्यांना राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा दीर्घकाळ अनुभव आहे, या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांची प्रचार समिती अध्यक्षपदावर निवड करण्यात आल्याचे समजते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group