मोदींच्या सभास्थळी सुशिक्षित बेरोजगार तरुणाने लावले फ्लेक्स, म्हणाला.....
मोदींच्या सभास्थळी सुशिक्षित बेरोजगार तरुणाने लावले फ्लेक्स, म्हणाला.....
img
Dipali Ghadwaje
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचार सभा, रॅलीचे आयोजन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा एकच धडाका लावल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर पुण्यातील वानवडी येथील रेस कोर्स मैदानावर पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही सभा आज सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. तर या सभेला महायुतीचे जवळपास दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी शक्यता भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेस कोर्स या मैदानावर सभा होणार अशी घोषणा आठवड्याभरापूर्वी करण्यात आली होती. तेव्हापासून पुणे पोलिसांनी मैदानाचा ताबा घेतला होता. तर दुसर्‍या बाजूला पुणे शहर भाजपकडून मैदानावर तयार सुरू केली.

पण या सर्व घडामोडी दरम्यान रेस कोर्स मैदानाच्या परिसरात वानवडी भागात राहणाऱ्या आयुष दीपक कांबळे या तरुणाने, एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकर, निर्यात बंदी असो महागाई असो, बेरोजगार असो, इथल्या प्रत्येक शेतकर्‍याचा, मायमाऊलीचा, युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही. जाती, धर्म, मंदिर, मशिद यावर बोलण्यापेक्षा विकासावर, बेरोजगारीवर बोला, या आशयाचा मजकूर असलेले फ्लेक्स सभेच्या परीसरात लावले आहेत. तर हे फ्लेक्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
 
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group