पंतप्रधानांच्या सभेचा बंदोबस्त आटोपून घरी जाताना जेलरोडला अपघात; 1 ठार तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
पंतप्रधानांच्या सभेचा बंदोबस्त आटोपून घरी जाताना जेलरोडला अपघात; 1 ठार तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा बंदोबस्त आटोपून रात्री उशिरा पुतण्या सोबत घरी जात असलेल्या पोलीस कर्मचारी च्या वाहनाला जेलरोड येथे भीषण अपघात झाला असून त्यात पुतण्या चा जागीच मृत्यू झाला तर पोलीस काका गंभीर जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजानक आहे.

उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड (वय 38) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकी करीता अहमदनगर येथे आयोजित केलेल्या बंदोबस्त करीता रवाना झाले होते. बंदोबस्त आटोपून ते नगर येथून नाशिक कडे निघाले. रात्री उशिरा ते बिटको चौकात आले असता त्यांना एकही प्रवासी वाहन भेटत नव्हते. म्हणून खर्जूल मळा, सिन्नर फाटा येथील मोहन बाळू गायकवाड (वय 36) या पुतण्या दुचाकी घेऊन बिटको चौकात बोलावले.

दोघे काका पुतणे आपल्या होरो होंडा दुचाकी क्र.MH 15DJ8778 वरून काका स्वप्नील गायकवाड यांना घेऊन त्यांच्या प्रभात सोसायटी, मॉडेल कॉलनी जेलरोड येथे जात असतांना त्यांना होंडा सिटी कार MH 01 AX3760 यावरील चालकाने जबर धडक दिली. त्यात काका पुतणे गंभीर जखमी झाले.

त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता पुतण्या मोहन बाळू गायकवाड यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. तर पोलीस काका स्वप्नील गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजानक असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकदेव काळे करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group