Nashik : लाच घेताना महिला शिपाई एसीबीच्या जाळ्यात
Nashik : लाच घेताना महिला शिपाई एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक - 500 रुपयांची लाच घेताना विद्युत निरीक्षक कार्यालयातील महिला शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

सौ. गीता हेमंत बोकडे (वय 45) शिपाई - विद्युत निरीक्षक कार्यालय, उद्योग ऊर्जा कामगार विभाग,नाशिक. (रा. फ्लॅट नंबर २२,गणेश वास्तू अपार्टमेंट, अशोका मार्ग नाशिक) असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार या विद्युत अभियंता असून त्यांना विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळणे करता, विद्युत निरीक्षक कार्यालय उद्योग ऊर्जा कामगार विभाग नाशिक येथे अर्ज करावयाचा असल्याने बोकडे या सदर कार्यालयात कार्यरत असल्याकारणाने फिर्यादी यांच्यावर सदर परवाण्याकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून परवाना मिळून देईल असे सांगून तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून यापूर्वी १५०० रुपये लाचेची मागणी केली.

त्यातील १००० रुपये यापूर्वी स्वीकारले असून आज तक्रारदार यांच्या तक्रारी प्रमाणे उर्वरित ५०० रुपयांची लाच मागणी करून लाच रक्कम स्वीकारली. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री मधुकर जाधव, पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group