मनमाड (प्रतिनिधी) :- शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकात कपाटाची चावी बनवून देतो असे सांगत कपाटातील ८ लाख २६ हजार रुपये किमतीचे सोने चांदिचे दागिने अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी भयभीत झाले आहेत.
याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात नंदा शंकर गवळी (वय ६०, रा. गवळी वाडा, गांधी चौक , मनमाड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, घरामध्ये एकटी असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरा समोरून एक चावी बनवणारा इसम गल्लीतुन जातांना दिसला. मला माझ्या कपाटाची चावी बनवायची असलयाने मी त्याला माझ्या घरात बोलावून घेतले व त्यास कपाटाची चावी बनवण्यासाठी सांगितले. सुमारे एक तास तो कपाटाची चावी बनवत होता. त्यानंतर त्याने एक चावी कपाटाच्या लॉक मध्ये फसवून तोडून टाकली व मी माझ्या चचेरे भाईला बोलावून घेवून येतो असे म्हणून गेला तो परत आला नाही.
त्यानंतर मी कपाट उघडून पाहिले असता कपाट उघडत नव्हते. म्हणून मी त्याच दिवशी भाग्यलक्ष्मी बँके जवळ असलेल्या चावी वाल्याला बोलावले पण तो आला नाही. त्यांनतर शहरातील आर. के. चावीवाला यास बोलवले व त्यांनी नविन चावी बनवून कपाट खोलले तेव्हा मी कपाटातील आतील लॉकर चेक केले तेव्हा कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले २,००,००० रुपये किंमतीची ४० ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची गळ्यातील तिन पदरी पोत, १,२५,००० रुपये किंमतीची २५ ग्रॅम वजनाची जुनी वापरते सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत, २,२५,००० रुपये किंमतीची ४५ ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत, ५०,००० रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची माळ असलेली पोत, ५०,००० रुपये किंमतीची १० गॅम वजनाची जुनी वापरती सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत, २५,००० रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याच्या पंचाल्या, ६५,००० रुपये किंमतीची १३ ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची शॉर्ट पोत, ४०,०००/-रुपये किंमतीची ८ ग्रॅम वजनाचे जुने वापरते सोन्याचे मणी व डोरले, २०,००० रुपये किंमतीची ४ ग्रॅम वजनाच्या जुन्या वापरत्या सोन्याच्या ३ अंगठ्या, १५,०००रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाची जुने वापरते सोन्याचे कानातले दागिणे, ५००० रुपये किंमतीची १ ग्रॅम वजनाच्या जुन्या वापरत्या सोन्याच्या २ नथी, ६००० रुपये किंमतीची १० तोळे चांदीचे दागीणे त्यात पायातील पट्टया असे ८ लाख २६ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले.
मनमाड पोलिसांनी भादंवि ३८० प्रमाणे मला दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.