नाशिक : महायुतीच्या जागावाटपात प्रतिष्ठेची झालेल्या नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे वाढले आहेत. दोन दिवसांत शिंदे दुसऱ्यांदा नाशकात पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रोड शो होणार आहे. या रोड शोसाठी मुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये उतरले.
नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँडिंग झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या २ बॅगांची तपासणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शिंदेंनी बॅगांमधून पैसे आणल्याचा आरोप केला होता.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिकमध्ये लँडिग होताच निवडणूक अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी त्यांच्या बॅगामध्ये काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही.
संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये बॅगांमधून पैसे आणल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणी ही झाली आहे.