लोकसभा निवडणूक मतदानासाठी जिल्ह्यात १०८ मॉडेल पोलिंग बूथ
लोकसभा निवडणूक मतदानासाठी जिल्ह्यात १०८ मॉडेल पोलिंग बूथ
img
Dipali Ghadwaje
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात १०८ मॉडेल पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे.

यामध्ये मतदारसंघ निहाय विशेष थीमवर २ पोलिंग बूथ, महिला विशेष-२, दिव्यांग विशेष-१ अशा एकूण १०८ पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे.

नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मा. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात मॉडेल पोलिंग बूथ ही संकल्पना राबवली जाणार आहे.

मॉडेल पोलिंग बूथवर विविध थीमवर सुशोभिकरण केले जाणार आहे, सेल्फी पॉईंट, रांगोळी सजावट, मतदान जनजागृती विषय बॅनर्स असणार आहेत. तसेच महिला विशेष, युवक विशेष आणि दिव्यांग विशेष मतदान केंद्रांवर देखील सजावट आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group