राज्यामध्ये महायुतीला पोषक वातावरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यामध्ये महायुतीला पोषक वातावरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - राज्यामध्ये महायुतीला पोषक असे वातावरण असून 45 पेक्षा अधिक जागा मिळतील अशी परिस्थिती आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील जनतेला विकास पाहिजे आहे आणि त्यासाठी म्हणून आता जनतेने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यानंतर तिसरा आणि चौथा टप्प्यातही महायुतीला समर्थन देण्याचा निर्णय घेऊन महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचा विश्वास बोलून दाखवला आहे.

एकूणच आत्ताची परिस्थिती बघितली तर महायुतीला पोषक अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळेच राज्यामध्ये भाजपा शिवसेना रिपाई मनसे व इतर मित्र पक्षांच्या 45 खासदार हे लोकसभेत जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की जानकर यांनी धनुष्यबाण आणि कमळ हातामध्ये घेतलं नाही तरी चालेल पण त्याचा टेकू घेऊन ते लोकसभा निवडणूक लढवीत आहेत याचा विचार त्यांनी करावा असे ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील शांतिगिरी महाराज यांच्या बाबत बोलताना सांगितले की साधू महंतांनी धार्मिक अनुष्ठान केले पाहिजे.

राजकीय अनुष्ठान करता कामा नये त्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे पण राजकारणामध्ये उतरता कामा नये. आज समाजाला धार्मिक शिकवण्याची आवश्यकता आहे आणि ती भविष्यात राहील पण त्याचा विचार करून सर्वांनी त्या पद्धतीप्रमाणे काम केलं पाहिजे असे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषद पूर्वी नाशिक मध्ये आखाडा परिषद तसेच वारकरी संप्रदाय व इतर धार्मिक क्षेत्रातील साधू महंत आणि धर्मगुरूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महायुतीला पाठिंबा असल्याचे देखील यावेळी सांगितले.

यावेळेस शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, भाजपा महानगराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश लोंढे, गणेश उनवणे, मनसेचे माजी महापौर अशोक मुतडक, सुजाता डेरे, सलीम मामा शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते
इतर बातम्या
Join Whatsapp Group