देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरिता
देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरिता "या" उपविभागातील वीज पुरवठा बंद राहणार
img
दैनिक भ्रमर

                      
नाशिक : महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ अंतर्गत सिडको उपविभागातील विविध विद्युत वाहिनीचा वीज पुरवठा विद्युत यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दि. १५ मे ते १८ मे या कालावधीमध्ये रोज सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत बंद राहणार आहे.

यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह इतर महत्वाची कामे करण्यात येणार आहे तरी ग्राहकांनी संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे. 

यामध्ये दि. १५ मे :- ११ के.व्ही. गोविंदनगर विद्युत वाहिनीवरील प्रताप चौक, पांगरेमळा, कुबेर् लाँन्स, पाण्याची टाकी तसेच परिसर. 

दि. १६ मे :-  ११ के.व्ही. लेखानगर विद्युत वाहिनीवरील राणाप्रताप चौक, औदुंबर बस स्टॉप, प्रभात कॉलनी, स्टेट बँक, लाईफ केअर रुग्णालय, शिवाजी भाजी मार्केट, बुरकुले नगर, पांगरे मळा तसेच परिसर.                 

दि. १६ मे :- ११ के.व्ही. प्रकाश विद्युत वाहिनीवरील विश्वास बँक, चंद्रावेल, सुनील मेडिकल, शारदा निकेतन, इंदिरानगर बोगदा, दत्ता टायर तसेच परिसर. 

दि. १७ मे :- ११ के.व्ही. सदगुरु नगर विद्युत वाहिनीवरील गणपती मंदिर, सागर स्वीट, मनोहर नगर, सदगुरु, सदाशिव नगर, चर्च लाईन, काशिकोनगर तसेच परिसर. 

दि. १७ मे :- ११ के.व्ही. पिम्प्रीकर विद्युत वाहिनीवरील बीएसएनल चौक, पिम्प्रीकर रुग्णालय, पाटील क्लासिक, रिलायन्स अपार्टमेन्ट, अश्विनी रुग्णालय, जॉगिंग ट्रँक तसेच परिसर. 

दि. १८ मे :- ३३ के.व्ही. सिडको विद्युत वाहिनीवरील अंबड एम.आय.डी.सी., मारीगो इमारत, उपेंद्र नगर, उत्तम नगर काँलेज, महाकाली चौक तसेच परिसर. वरीलप्रमाणे परिसरातील वीज पुरवठा  देखभाल व दुरुस्तीच्या कामा करीत बंद करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात येत आहे. 
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group