प्रादेशिक पक्ष विलीनीकरणावर शरद पवारांचं पुन्हा मोठं विधान; म्हणाले, 'सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये......'
प्रादेशिक पक्ष विलीनीकरणावर शरद पवारांचं पुन्हा मोठं विधान; म्हणाले, 'सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये......'
img
Dipali Ghadwaje
भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी शरद पवार आग्रही होते, भाजपसोबत ६ वेळा बैठकाही झाल्या होत्या, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. 

अजित पवार यांच्या या दाव्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच २०२४ लोकसभेनंतर सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, असा मोठा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

"काँग्रेस विचारधारेच्या जवळ जाणारे काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक आहे. दोन्ही पक्ष स्थापन झाल्यापासून एकत्र काम करत आहेत. एकत्र काम आणि एक विचारधारा यामुळे अधिक एकत्र काम करावं अशी माझी भावना आहे. मात्र सरसकट प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत," असे शरद पवार म्हणालेत तसेच यावेळी बोलताना अजित पवार यांच्या दाव्यावरही शरद पवारांनी प्रत्यूत्तर दिले. 

काहीही झालं तरी "आम्ही गांधी नेहरुंचा विचार सोडणार नाही. आमच्यातील काही सहकारी भाजपसोबत जाण्याच्या विचाराचे होते. मी सहकाऱ्यांना सांगितलेलं चर्चा करायची तर तुम्ही करा. मात्र सोबत जाण्याचा निर्णय पक्षाचा नव्हता, असे ते म्हणाले. तसेच शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. त्यांचे अस्तित्व स्वतंत्र आहे," असेही महत्वाचे विधान त्यांनी केले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group