लोकसभेला लोकांनी शांतपणे क्रांती केली, आता राज्यात..   काय म्हणाले शरद पवार ?
लोकसभेला लोकांनी शांतपणे क्रांती केली, आता राज्यात.. काय म्हणाले शरद पवार ?
img
दैनिक भ्रमर
बदलापुरातील संतापजनक घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  एखादी घटना घडली की लोकांच्या प्रतिक्रिया कशा होतात, हे काल आपण बदलापूरच्या घटनेवरून पाहिलं, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसंच लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाविकासआघाडीला यश मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

 ‘गेल्यावेळी काँग्रेसला 1 जागा होती, यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि आपण एकत्र निवडणूक लढवली आणि आपण 48 पैकी 31 जागा जिंकल्या. आता विधानसभा निवडणूक आली आहे, आता आपले लोक ठिकठिकाणी फिरत आहेत, माहिती घेत आहेत. लोकांना बदल हवा आहे’, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान ,  ‘लोकसभेला लोकांनी शांतपणे क्रांती केली, आता राज्यात निवडणुका आहेत आणि लोकांनी निश्चित केलं आहे की काहीही झालं तरी हे सरकार बदलायचं आहे. आपलं सरकार आणण्याचा सामूहिक प्रयत्न केला जाईल. तुम्ही जिथे काम करता तिथल्या तुमच्या सहकाऱ्यांना वाटलं पाहिजे, की एक नवा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आपण सगळे जण करूया’, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.

काहीच दिवसांपूर्वी झालेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा, तुम्ही द्याल त्या चेहऱ्याला पाठिंबा देऊ, असं उद्धव ठाकरे जाहीरपणे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनावर शरद पवार यांनी मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 






इतर बातम्या
Join Whatsapp Group