मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 20 मे रोजी शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदार संघात आज मतदान पार पडत आहेत यात मुंबईतील सहाही मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच ठाणे भिवंडी कल्याण , डोंबिवली ,पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. कल्याण मधून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निमित्त श्रीकांत शिंदे यांचे आईने औक्षण केले त्यानंतर एकनाथ शिंदे सह कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला. 


दरम्यान माध्यमांशी बोलताना "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत , त्यामुळे महाराष्ट्रातील जनता महायुतीला मतदान करणार असा मला विश्वास आहे." असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

इतर बातम्या
Join Whatsapp Group