'प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा', ठाकरेंच्या खासदाराचे काँग्रेस हायकमांडला पत्र; काय आहे प्रकरण ?
'प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा', ठाकरेंच्या खासदाराचे काँग्रेस हायकमांडला पत्र; काय आहे प्रकरण ?
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीने विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेलाही मविआ एकत्रित लढणार असल्याचे चित्र दिसत असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे 

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्ट्रीकर यांनी काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांची तक्रार केल्याने मविआमध्ये वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळू नये, अशी तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे. यासंबंधी त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे पत्रही पाठवले आहे.

प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म न पाळता विरोधात काम केले. त्या मविआच्या कोणत्याही प्रचार सभेत सहभागी झाल्या नाहीत. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि एनडीएच्या उमेदवारांना मदत केल्याचे आरोप नागेश पाटील यांनी केले आहेत. यासंबंधी त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी वेणुगोपाल राव यांना पत्रही पाठवले आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखील पक्षविरोधी काम केले आहे.

त्यामुळे त्यांना देखील विधानसभेचे तिकीट मिळणार नाही असे खासदार नागेश पाटील म्हणाले. ज्या दिवशी वानखेडे तिकीट मागतील तेव्हा आपण त्यांची तक्रार पक्षाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आष्टीकर यांच्या या तक्रारीमुळे मविआमध्ये वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group