तरुणाने  महिलेच्या डोक्यात दगड टाकून केला खून... कुठे घडलीय
तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड टाकून केला खून... कुठे घडलीय "ही" घटना !
img
Jayshri Rajesh
जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विधवा महिलेच्या डोक्यात दगड टाकून तरुणाने खून केल्याची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेतत तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड घालून तीचा खून करुन तो फरार झाला.

 जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील संशयित किरण कोळी उर्फ लाहण्या (वय २६) हा तरुण महिलेच्या घरी जाऊन सतत महिलेसोबत वाद घालत असे. 1 जुलै रोजी सकाळी महिलेसोबत वाद घालून रागाच्या भरात आरोपी किरण कोळी याने संगीता पिराजी शिंदे (वय ३६) हिच्या डोक्यात दगड टाकून महिलेला ठार केले व घटनास्थळावरून पळून गेला.

हा प्रकार घराजवळील काही नागरिकांच्या लक्षात येताच जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती त्यांनी दिली. तात्काळ घटनास्थळी पोलिस यंत्रणा दाखल झाली. फरार झालेल्या संशयिताचा शोध घेत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करत आहे. सदर संशयितास जामनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group