शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दुधाच्या दरावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. वावातील दूध परिषद आणि शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी यांनी सरकारवर ह्ल्लाबोल केला आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी गावात भव्य दूध परिषद आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दूध परिषद आणि शेतकरी मेळावा पार पडला. दूध परिषद आणि शेतकरी मेळाव्यातून सात मागण्याचे ठराव केले गेले आहेत.
या मेळाव्यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. जोपर्यंत दुधाला चाळीस रुपये बाजार भाव मिळणार नाही. तोपर्यंत एकही मंत्र्यांना फिरकू देणार नाही. मंत्र्यांना दूधाने आंघोळ घालावी. 40 बाजार भाव द्या नाहीतर मग भेसळखोरांवरवर कारवाई करावी. राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितल.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी आमदार होतो. मुंबईमध्ये दुध आणण्यासाठी गुजरातला गेले होते. गुजरातवरुन येणारे दुधाचे टँकर आम्ही अडवले होते. त्यावेळी विलासराव देशमुख अमेरिकेत होते. विलासरावांचे अमरिकेवरुन रात्री दोन वाजता फोन आला होता.
अमिरिकेत असून सुद्धा विलासराव देशमुखांनी फोन केले होते. त्यानंतर आर.आर.पाटील यांच्यासोबत माझी बैठक झाली होती. त्यानंतर विलासरावांनी मला दिलेला शब्द पाळला होता. पुन्हा दहा वर्षांनी मुंबईचे दूध मुंबईचे ही भूमिका घेतली, यावेळी शेट्टींनी जुन्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला