धक्कादायक! अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपींना अटक
धक्कादायक! अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपींना अटक
img
Jayshri Rajesh
एका वयोवृद्ध व्यक्तीला काही तरुणांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला. याठिकाणी एका वयोवृद्ध भिकाऱ्याची काही तरुणांसोबत बाचाबाची झाली होती. या वादामुळे तरुणांनी त्या वृद्ध व्यक्तीवर चक्क पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. किरकोळ वादाचे रुपांतर जीवघेणा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील शंभूनगर येथील शहाणूर मिया दर्गा परिसरात असणाऱ्या त्रिशरण चौकात तीन तरुणांनी एका ५७ वर्षांच्या भिकारी व्यक्तीला जिवंत जाळण्याचे थरारक कृत्य केले आहे. या घटनेमध्ये वृद्ध व्यक्ती गंभीररित्या भाजली असून त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याच्या आधारे संभाजीनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

 छत्रपती संभाजीनगर शहरातील शहाणूर मिया दर्गा परिसरात असणाऱ्या त्रिशरण चौकात ही धक्कादायक घटना घडली. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ३ तरुणांनी एका ५७ वर्षांच्या भिकारी व्यक्तीला जिवंत पेटवून दिले. या घटनेमध्ये महिपालसिंग रणधीरसिंग गौर हे ३५ टक्के भाजले असून त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आदिल शेख, कृष्णा शिंदे आणि शेख अयाज अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत.अटक केलेल्या आरोपींविरोधात यापूर्वी विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group