भाऊ झाला वैरी ! १० बाय १० च्या खोलीसाठी केले सख्ख्या बहिणीचे  तुकडे , कुठे घडली घटना ?
भाऊ झाला वैरी ! १० बाय १० च्या खोलीसाठी केले सख्ख्या बहिणीचे तुकडे , कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर

काही दिवसांआधी पुण्यात मुठा नदीत शिर आणि हात-पाय नसलेला मृतदेह सापडला होता. धक्कादायक बाब म्हणजे सख्खा भाऊ आणि वहिनीने १० बाय १० च्या घरासाठी बहिणीची हत्या केली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे . नदीच्या पात्रात आढळून आलेल्या त्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. हा मृतदेह सकिनाखान नावाच्या महिलेचा होता आणि धक्कादायक बाब म्हणजे तिचा खून तिच्याच सख्ख्या भावाने केल्याचं तपासातून समोर आलंय. हा खून इतक्या निर्घृणपणे करण्यात आला की पुरावे मिळू नये म्हणून भावाने आपल्या बहिणीच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले.

याविषयी अधिक माहिती अशी की , पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीवरुन भाऊ अन् बहिणीत अनेक महिन्यांपासून वाद सुरु होता. ही खोली सकीनाचा नावावर होती. पण भाऊ अश्फाक आणि वहिनी हमीदाने तिच्यामागे खोली रिकामी करण्यासाठी तगादा लावला होता. पण सकीना घर सोडून जाणार नाही यावर ठाम होती. हा राग मनात ठेवून भाऊ आणि वहिनीने तिच्या हत्येचा कट रचला. तिची गळा दाबून हत्या केली आणि पोलिसांना काही कळू नये म्हणून घरात धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे तुकडे केले. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी पुण्यात खूप पाऊस होता त्या दिवशी संगमवाडीमधील नदीपात्रात  फेकून दिलं.

४८ वर्षीय धुणीभांडी करणारी सकिना खान शिवाजीनगर भागातील झोपडपट्टीत एका १० बाय १० आकाराच्या खोलीत राहायची. अश्फाक ने त्याच्या बायकोच्या मदतीने सकीनाचा खून केला. भाऊ अश्फाक आणि त्याची बायको हमीदा हिने सकीनाच्या मृतदेहाचे तुकडे करत संगमवाडीच्या पुलावरून मुठा नदीत फेकून दिले. शेजारच्यांना सकीना गावाला गेल्याचं खोटं सांगितलं.सकिनाचं शिर आणि हात-पाय नसलेलं धड नदीत सापडलं होतं. पण म्हणतात ना कानून के हात बहुत लंबे होते है! तांत्रिक पुरावा जोडत स्थानिकांची मदत घेत पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group