तरुणाची निर्घृणपणे हत्या ! टोळीचा हल्ला, रस्त्यावर रक्ताचा सडा...
तरुणाची निर्घृणपणे हत्या ! टोळीचा हल्ला, रस्त्यावर रक्ताचा सडा...
img
दैनिक भ्रमर
वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टोळीने एका तरुणाची निघृणपणे हत्या केल्याची खबळजनक घटना घडली आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, पोलीस स्टेशनच्या भिंतीजवळच या तरुणाची हत्या करण्यात आली. राहुल वाघ असं या तरुणाचं नाव आहे.

भर दिवसा 8 ते 10 जणांच्या अज्ञात टोळक्याने एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली आहे. या टोळक्याने सपासप चाकूने वार करून तरुणाची हत्या केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. राहुल वाघ हा वाशिमच्या एका खाजगी दवाखान्यात काम करत होता अशी माहिती समोर आली आहे. एका टोळक्याने राहुलला गाठलं आणि मारहाण सुरू केली. वाद इतका विकोपाला गेला की, या टोळक्याने राहुल वाघ याच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत राहुल उठून उभा राहिला आणि चालत - चालत 50 ते 60 फूट जाऊन पुढे कोसळला. त्यामुळे पूर्ण रस्ता रक्ताने माखला.

दरम्यान , हल्ल्यानंतर अज्ञात आरोपीचं टोळकं बाईक घेऊन पसार झालं आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाशिम पोलीस, फॉरेन्सिक पथक दाखल झालं. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. राहुल वाघ याची हत्या का करण्यात आली, याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. या प्रकरणातील मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. मात्र, दिवसा ढवळ्या घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे वाशिममध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group