सीबीआयच्या नावाखाली १२ लाखांची फसवणूक ७ कोटींच्या मनी लॉड्रिंगप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
सीबीआयच्या नावाखाली १२ लाखांची फसवणूक ७ कोटींच्या मनी लॉड्रिंगप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर

इगतपुरी (भ्रमर वार्ताहर) : सात कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणात अडकविण्याची धमकी देऊन सीबीआयमधून बोलत असल्याचे भासवून एकाची १२ लाख रुपयांंची फसवणूक करणार्‍या तिघांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी विजय खन्ना याचा २८ ते ३० ऑगस्टला ७९७७३८०१९८ आणि ८३७४६१९८२७ या नंबरवरून व्हॉटसअ‍ॅप कॉल येवुन त्यात आम्ही सीबीआयमधून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे त्याने खोटे सांगितले.

फिर्यादीला त्याची सर्व माहिती विचारून तुमच्या विरूध्द कॅनरा बँकेत मनी लॉन्ड्रींगची केस दाखल आहे. तुम्ही नरेश गोयल यांच्यासोबत मिळुन ७ कोटीची मनी लॉन्ड्रींग केलेली आहे. याबाबत कोणाला काही माहिती दिली तर तुमचे कुटुंबाला त्रास होईल अशी खोटी धमकी देऊन घाबरून दिले. व्हॉटसअप कॉल, स्काईप अ‍ॅप व्हिडीओ कॉल करून तुम्हाला केसमध्ये मदत करू असे खोटे सांगितले.

त्यासाठी त्याने भारतीय स्टेट बँके शाखा गुरगाव खाते क्रमांक ४११०३८६४८५६ यावर १२ लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार कुटुंबाला त्रास होईल म्हणुन भारतीय स्टेट बँक शाखा इगतपुरीच्या ११५४२१६६६४९ या खात्यावरून फिर्यादीने धनादेशाने १२ लाख रुपये टाकले. मात्र आपली फसवणुक झाल्याचे समजताच रामप्रताप रामदेव यादव(वय ७६ रा. धम्मगिरी, इगतपुरी) यांनी इगतपुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी फिर्यादीनुसार संशयित आरोपी विजय खन्ना, राहुल गुप्ता, रेखा (पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा २००५ चे कलम ६६ (क), ६६ (ड) आणि भा. न्या. स. कलम २०४, ३१८(४) नुसार हा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी तपास सुरु केला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group