कोलकाता प्रकरणाच्या निषेधार्थ  देहविक्री करणाऱ्या महिलांनी केलं  ''हे'' आवाहन
कोलकाता प्रकरणाच्या निषेधार्थ देहविक्री करणाऱ्या महिलांनी केलं ''हे'' आवाहन
img
दैनिक भ्रमर
कोलकाता येथे डॉक्टर वर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेला  बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे राज्यभरातून पडसाद उमटत आहेत .आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देशभरातून होत आहे .. यासाठी आंदोलनहि  करण्यात आली.  दरम्यान , आता याच कोलकाता या ठिकाणी असलेल्या सोनागाछी या ठिकाणी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांनीही महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

सोनागाछी हा कोलकाता येथील रेड लाईट एरिया आहे. या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या महिलांनी कोलकाता बलात्कार आणि हत्याकांडाचा निषेध केला आहे. देहविक्री करणारी महिला म्हणाली, “तुमच्या शरीराची भूक इतकी उफाळून आली असेल तर खुशाल सोनागाछीला या, तुमची भूक भागवा. पण कृपा करुन कुठल्याही मुलीचं किंवा महिलेचं शोषण करु नका तसंच कुणावरही बलात्कार करु नका.” देहविक्री करणाऱ्या इतर महिलांनीही अशाच प्रकारे मतप्रदर्शन केलं आहे. एका वृत्तपत्राने हे वृत्त दिलं आहे.

या विषयी अधिकल माहिती अशी की , कोलकाता येथे डॉक्टर महिलेवर  अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.   ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आर. जी. कर रुग्णालयात आढळला होता. या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या पीडितेच्या शवविच्छेदनानंतर तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group