मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत तरुणाच्या घराची तोडफोड
मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत तरुणाच्या घराची तोडफोड
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तरुणाकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाच्या घराची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी सहा ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी खैरुन्निसा शब्बीर सय्यद (वय 49, रा. गुलाबवाडी, नाशिकरोड) यांच्या बहिणीचा मुलगा कलाम मन्सुरी याच्यासोबत प्रेमप्रकरण असलेल्या मुलीने काही तरी कारणावरून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याचा राग मनात धरून दि. 31 ऑगस्ट व 2 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी खैरुन्निसा या गुलाबवाडी येथे असताना आरोपी प्रज्ञा उघडे, आदित्य भालेराव, सुनील राऊत, बब्या, दिनेश गायकवाड, गणेश गायकवाड व त्यांच्यासोबत इतर सहा ते आठ इसम हातात कोयता, पहार व हातोडा घेऊन आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांच्या घराचे दरवाजे तोडून घरात घुसून साहित्याची तोडफोड करून नुकसान केले.

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group